Home क्राईम अश्लिल शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

अश्लिल शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

0
103


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एका विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात ४२ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता महिला घरी असतांना याकुब दाउद खान उर्फ बांगी रा. जळगाव हा घरी आला. काहीही कारण नसतांना तिला अश्लिल शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने गुरूवारी २८ डिसेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी याकुब दाऊद खान याच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बालाजी बारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound