जळगावात स्टाफनर्सचा विनयभंग; एकावर जिल्हापेठ पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हॉस्पीटलमध्ये काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला असून एकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. 

सविस्तर वृत्त असे की, शहरातील २३ वर्षीय तरूणी एका हॉस्पिटलमध्ये स्टाफनर्स म्हणून काम करते. शनिवार ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास काम करत असतांना संशयित आरोपी विजय चौधरी उर्फ पल्टी (वय-२४) रा. रथ गल्ली पारोळा हो हॉस्पिटलमध्ये येवून स्टाफनर्स तरूणीला अश्लिल शिवीगाळ करून विनयभंग केला. हा प्रकार सहन न झाल्याने तरूणीने जिल्हा पेठ गाठून संशयित आरोपी विजय चौधरी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे करीत आहे. 

 

Protected Content