जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील नशिराबाद गावात अल्पवयीन मुलीच्या छेड काढत मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी २ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. पीडित अल्पवयीन तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपींना अटक व्हावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस ठाण्याबाहेर काही जण आक्रमक झाले. यावेळी दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दुपारी ३ वाजता छेडखानी करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला मारहाण केल्याची घटना रविवारी २ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली. या घटनेनंतर जमावाने पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातला होता. दोन गट समोरासमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. पीडित अल्पवयीन तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपींना अटक व्हावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस ठाण्याबाहेर काही जण आक्रमक झाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला. अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी तीन जणांना नशिराबाद पोलीसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मारूफ शेख मनियार, मारूफ शेख रउफ आणि रिजवान शेख आसिफ तिघे रा. नशिराबाद यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.