यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडासिम येथील २२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सावखेडासिम येथील २२ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियासह राहते. १५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सावखेडा-दहीगाव रोडवर शौचालयास जात असतांना गावातील कुरबान अकबर तडवी हा महिलाजवळ आला. अश्लिल बोलून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ असलम खान दिलवर खान करीत आहे.