जळगाव प्रतिनिधी । शहरातील मुक्ताईनगर कॉलनीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुक्ताईनगर कॉलनीच्या भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. दिगंबर शालीकराम मुकुंदे (वय-३६) रा. मुक्ताईनगर जळगाव हा पिडीत मुलीच्या वडीलांच्या ओळखीचा असल्यामुळे घरात नेहमी ये-जा करत असतात. शुक्रवार ९ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास दिगंबर शालीकराम मुकुंदे हा तरूण पिडीत मुलगी घरात एकटी असतांना घरी आला. पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात आल्यानंतर त्याने पिडीत मुलीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. पिडीत मुलीने हा प्रकार वडीलांना सांगितला. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रात्री संशयित आरोपी दिगंबर मुकुंदे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.