पैसे देण्याची आमिष दाखवत चिमुकलीचा विनयभंग; संशयिताला अटक

वरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या चिमुकलीला १० रूपये देण्याचे आमिष दाखवत विनयभंग केल्याची घटना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव शहरातील वैदूवाडा परिसरात ७ वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास याच परिसरात राहणारा नंदकिशोर मधुकर चौधरी याने पिडीत चिमुकलीला १० रूपये देण्याचे आमिष दाखवत तिला घरात बोलावून तिचा विनयभंग केला. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने थेट वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी नंदकिशोर मधुकर चौधरी रा.वरणगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जैन हे करीत आहे.

Protected Content