हरीविठ्ठल नगरात विवाहितेचा विनयभंग; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या भाजीपाला विक्री करणाऱ्या ३६ वर्षीय विवाहितेला अश्लिल शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरूणावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका भाजीपाला विक्री करणाऱ्या 36 वर्षीय महिला आपल्या पती व मुलांसह वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. त्याच भागात राहणारा संशयित आरोपी दिनेश रवींद्र बारी (वय-२५) हा विवाहितेला गेल्या एक वर्षांपासून पाठलाग करत आहे. विवाहितेला फोनवर अश्लील शिवीगाळ करून पती व मुलांना सोडून माझ्याकडे राहा असे बोलून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सोमवार ३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घडला. याप्रकरणी विवाहितेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी ४ जानेवारी रोजी रात्री धाव घेऊन रिक्षाचालकाविरोधात तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी दिनेश रवींद्र बारी याच्याविरोधात रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश पाटील करीत आहे.

 

Protected Content