आमोदा शिवारातून चोरट्यांनी एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी ।  तालुक्यातील आमोदा शिवारातून एकाची २० हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छगन काशिनाथ भालेराव (वय-५२) रा. ओम नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ते तालुक्यातील हातेड शिवारात मित्राला भेटण्यासाठी दुचाकी (एमएच १९ ए क्यू २९५४) ने गेले होते. त्यावेळी त्यांनी शेताच्या बंधावर दुचाकी पार्किंग करून लावली होती. रात्री १० घरी परतत असतांना त्यांना दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी तीन ते चार दिवस दुचाकीची शोधाशोध केली परंतू कुठेच आढळून आली नाही. मंगळवारी ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे करीत आहे.

Protected Content