चोपडा प्रतिनिधी । तालुक्यात हातेड बु ॥ येथे विवाहितेच्या पतीला शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन जणांवर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील हातेड बुद्रुक येथील ३३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या घरी दारावर आलेल्या पाहुण्यांसाठी मागच्या घरात चहा बनवित असतांना संशयित आरोपी नितीन रविकांत गोरे आणि रविकांत यशवंत गोरे दोन्ही रा. पंकज नगर जळगाव हा मागच्या घरातून आत प्रवेश केला व महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल कृत्य केले. तसेच महिलेचे पती व मामसासरे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल निता राजपूत करीत आहे.