अकलूज प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे मातब्बर नेते विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या चिरंजीवांनी भाजपमध्ये प्रवेश करावा असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला असून यामुळे लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यातील दरी गत काही दिवसांपासून वाढीस लागल्याचे चित्र आहे. शरद पवार यांनी माढ्यातून लढण्याची तयारी केली. मात्र मोहिती घराण्याच्या नाराजीची उघड लहर पाहून त्यांनी आपला निर्णय बदलला. दरम्यान, यानंतर माढ्यातून आपल्यालाच तिकिट मिळेल अशी आशा विजयसिंह मोहिते पाटील यांना होती. मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही याद्यांमध्ये माढा मतदारसंघाचे नाव नसल्यामुळे त्यांचे अस्वस्थता वाढली. या अनुषंगाने त्यांनी आज आपल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. यात बहुतांश समर्थकांनी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह धरला. यामुळे विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.