अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा येथील पदवीधर शिक्षक मोहन ताडे यांचा सेवापुर्तीनिमित्त नुकताच सत्कार करण्यात आला.
अमळनेर तालुक्यातील जि.प.उच्च प्राथ.शाळा, निंभोरा येथील पदवीधर शिक्षक मोहन भगवान ताडे हे आपल्या प्रदिर्घ सेवेतून दि.३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. बालपणी पित्रृछत्र हरपल्यामुळे हलाखीच्या परिस्थितीची जाणीव असलेल्या ताडेअप्पांनीही आपल्या ३३ वर्षांच्या सेवेत पारोळा तालुक्यातील खेडीढोक, कोळपिंप्री, जामनेर तालुक्यातील टाकरखेडा व अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री, देवगाव देवळी, निंभोरा या गावांत प्रामाणिक सेवा करत असतांना गरीबीचे चटके अनुभवल्यामुळे ग्रामिण भागातील गरीब व गरजू मुलांना यथाशक्ती मदत करुन निरोपाच्या अनावश्यक खर्चिक कार्यक्रमास फाटा देत विद्यार्थ्यांची आवड व निकड बघून जि.प.उच्च प्राथ.शाळा,निंभोरा शाळेला ३२ इंची एलईडी टिव्हीसह इ.१ ते ७ चा अभ्यासक्रम सॉफ्टवेअरसह भेट देऊन आपल्या डिजीटल शाळेचे स्वप्न पुर्ण केले. त्यांच्या दानशूरवृत्तीने खूश होऊन शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंदानेनेही त्यांचा यथोचित गौरव केला.
ताडे यांच्या निवासस्थानी सेवापुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला. याच्या अध्यक्षस्थानी माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिर्हाडे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जुने सहकारी मित्र व पदवीधर शिक्षक सुरेंद्रनाथ गोस्वामी यांच्या ओघवत्या व चपखल शैलीमुळे कार्यक्रमाची रंजकता वाढली. सर्वप्रथम मित्रपरिवारातर्फे ताडे यांचा सपत्नीक यथोचित गौरव करण्यात आला. यानंतर मान्यवरांनी मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी अशोक बिर्हाडे (मा.गशिअ,पं.स.अमळनेर), पी.डी.धनगर (शि.वि.अ.अमळगाव बीट), बी.ए.भागवत (सेवानिवृत्त केंद्रप्रमुख,अमळगाव), अरुण मोरे (केंद्रप्रमुख,जैतपीर), श्रीम.विद्यादेवी कदम (संचालिका ग.स.जळगाव), वाल्मिक पाटील (मा.संचालक,ग.स.जळगाव), श्री.सुरेंद्र गोस्वामी, अशोक इसे, भटू शिरसाठ, गोपाळ कोळी, संजय पाटील, सुदाम अहिरे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक), राजेंद्र सोनवणे, रामकृष्ण बाविस्कर, ज्ञानदेव पाटील, बी.डी.महाजन, पंकज शिसोदे, श्री.सुनिल वाणी, जी.डी.पाटील, सर्जेराव पाटील, विनोद पाटील, अरुण बाविस्कर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक), दत्तात्रय सोनवणे, योगेश पाटील, भरत कदम, गणेश महाजन, दिपक भामरे, विजय बिर्हाडे, बिरारी सर, रविंद्र बोरसे, नामदेव अहिरे, सचिन पाटील, हेमंत शिंदे, हिम्मत भोई, राजेश साळुंखे, निलेश पाटील, प्रदीपसिंग राजपूत आदी उपस्थित होते.