मुंबई प्रतिनिधी । पुण्यातून काँग्रेसने ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना उमेदवारी दिल्याने येथे आता बापट विरूध्द जोशी असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे येथून भाजपने मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली असली तरी काँग्रेसचा उमेदवार ठरत नव्हता. काँग्रेतर्फे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. तर अलीकडेच पक्षात दाखल झालेले प्रवीण गायकवाड यांना तिकिट मिळेल असे मानले जात होते. विशेष करून गायकवाड हे बापट यांना जोरदार टक्कर देऊ शकतात असे मानले जात होता. तथापि, पक्षश्रेष्ठींनी ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना तिकिट दिले आहे. यामुळे आता पुण्यात गिरीश बापट यांच्या विरूध्द मोहन जोशी अशी लढत निश्चित झाली आहे.