मुंबई, लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा । तेलंगणा राज्याच्या विकासासाठी मोदी सरकार पाठिंबा देत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी मोदींना सत्तेपासून खाली खेचणार असल्याचा पवित्रा जानगाव जिल्ह्यातील यशवंतपूर येथे जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यशवंतपूर येथे जाहीर सभेत त्यानी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडत गरज पडल्यास राष्ट्रीय राजकारणात भूमिका बजावण्यास तयार असल्याचे सांगितले.
तुम्ही आम्हाला राष्ट्रीय प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय, पाठिंबा दिला नाही तरी हरकत नाही आम्ही तुम्हाला सत्तेपासून सत्तेपासून खाली खेचून मदत करणारे सरकार सत्तेत आणू, असेही ते म्हणाले. तेलंगणात एनडीए सरकारने प्रस्तावित केलेल्या वीज सुधारणांची अंमलबजावणी राज्य सरकार करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.