नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियातील लोकप्रियता कायम असल्याचे ताज्या पाहणीतून आढळून आले आहे.
सोशल मीडियावरील लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांधिक आघाडीवर असल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे. यंदाच्या ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात ट्विटर, यूट्यूब, गूगल सर्चच्या सर्व ट्रेडिंग चार्टवर मोदी पहिल्या स्थानी आहे. चेकब्रँड या कंपनीच्या पाहणीत हे आढळून आले आहे.
सोशल मीडियाच्या विविध मंचांवर २१७१ ट्रेंडसह मोदी पहिल्या क्रमांकावर असून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी २१३७ ट्रेंडसह दुसर्या क्रमांकावर आहेत. सातत्याने वलयामध्ये राहणार्या अन्य नेत्यांत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे. अर्थात, यापैकी कुणालाही मोदींची बरोबरी करणे अशक्य असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.
देशातील ९५ प्रमुख नेते आणि सोशल मीडियावरील ५०० प्रमुख व्यक्तींच्या ऑनलाइन सेंटिंमेंटचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासानुसार त्यांची ब्रँड व्हॅल्यू ३२६ कोटी रुपये इतकी असल्याचे ऑनलाइन सेंटिमेंट विश्लेषण कंपनी चेकब्रँडने म्हटले आहे.