औसा वृत्तसंस्था । फुटिरतावादी लोकांसोबत उभे राहणे हे शरद पवार यांना शोभत नसल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केले. ते औसा येथील सभेत बोलत होते.
लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यात त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, ज्यांना काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवाय, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा केली जात नाही. पण शरदराव तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्ही संकल्प केला आहे. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्यात येणार नाही, असं काँग्रेस म्हणतेय. काँग्रेसचं ढकोसलापत्र (जाहीरनामा) आणि पाकिस्तानची भाषा एकच आहे. काँग्रेसलाही फुटीरतावाद्यांशी चर्चा करायची आहे आणि पाकिस्तानलाही तेच हवं असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी केला.