यावल (प्रतिनिधी ) तालुक्यातील वोडाफोन एयरटेल, जीटीएल तसेच रिलायन्सच्या टॉवरकडे तब्बल 1 लाख 46 हजार 720 रुपये महसूल थकबाकी आहे. त्यामुळे महसूल विभागाने थकबाकी असलेले चार टॉवर सील केले असून या कारवाईमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज मंडलधिकारी बांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील नावे प्र. येथील वोडाफोन एअरटेल जीपीएल रिलायन्स मोबाईल टॉवर यांच्याकडे १ लाख 46 हजार 720 रुपस्यांची थकबाकी होती. ही थकबाकी संबंधीतांनी भरली नसल्यामुळे आज मंडळ अधिकारी अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार कुंदन हिरे मंडल अधिकारी, तलाठी लीना राणे यांनी ही कारवाई केली. मसूर परिसरातील बिनशेती प्लॉट धारकांकडे जैन बिनशेती सारा बाकी आहे. अशा लोकांनी सात दिवसाच्या आत जर बिनशेती सारा भरला नाही, तर त्यांच्यावर 25 टक्के दंड आकारून कारवाई करण्यात येईल किंवा संबंधित प्लॉट शासन जमा करण्यात येतील, असे की बांगडे मंडळ अधिकारी यांनी पत्रकारव्दारे कळविले आहे.