मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ‘झांबरे वाडा’ येथे अज्ञात चोरट्यांनी महागडा लॅपटॉप आणि मोबाईल लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्तव्य बाळू टाकरखेडा (वय-१८) रा. झांबरे वाडा, मुक्ताईनगर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याच्या घरात ठेवलेला ३० हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप आणि ५ हजाराचा मोबाईल चोरून नेल्याची घटना सकाळी ६.३० ते ८.३० वाजेच्या दरम्यान उघडकीला आली.
याबाबत कर्तव्य टाकरखेडा याने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शैलेश चव्हाण हे करीत आहे.