जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अॅड.जमील देशपांडे यांचा ‘होम टू होम’ प्रचार सुरू आहे. एवढेच नव्हे तर, प्रत्येक दिवशी प्रचारासाठी अभिनव पद्धत वापरत असल्यामुळे देशपांडे यांच्या प्रचार पद्धतीची चांगलीच चर्चा सुरु आहे.
जमील देशपांडे यांनी शहरातल्या नागरीकांना प्रत्यक्ष भेटून पाच वर्षांत जळगावची काय अवस्था झाली याची जाणीव करून देण्यावर भर देत आहे. तर तत्पूर्वी मनसे पदाधीकाऱ्यांनी त्यांच्या प्रचारार्थ मास्टर कॉलनी, रजा कॉलनी, मलिक नगर, देशमुख नगर या परिसरात रॅली काढली होती. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करतांनाही देशपांडे यांनी वॉकरच्या सहाय्याने परिस्थिती प्रदर्शन करून धमाल उडवून दिली होती.
रिक्षा चालक बांधवांच्या हस्ते प्रचार शुभारंभ
शहरातील रिक्षा चालकच होणार मनसेचे स्टार प्रचारक या अभिनव कल्पक विचाराने जमील देशपांडे यांनी रिक्षा चालकाच्या गणवेशात प्रचार केला होता. देशपांडे यांनी वाहन चालक म्हणून शहरात नोकरी केली आहे. यावेळी देशपांडे यांनी दिवसभर शहरातील सर्व रिक्षा थांब्याना भेट देत प्रचार केला आहे. दरम्यान, देशपांडे हे उपेक्षित घटक… सोशिक..पिचलेला..समजल्या जाणाऱ्या रिक्षा चालक बांधवाला दरवर्षी आदर्श रिक्षा पुरस्काराने सन्मानित करत असतात.