अमळनेर प्रतिनिधी । येथे आज आमदार शिरिषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीचा स्नेह मेळावा होत असून यात आगामी लोकसभा निवडणुकीतील भूमिका स्पष्ट करण्यात येणार का ? याकडे लक्ष लागून आहे.
या मेळाव्यास हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी व आमदार शिरीष चौधरी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी आघाडीचे सर्व सरपंच -उपसरपंच-ग्रामपंचायत सदस्य- नगरसेवक-नगरसेविका -कृ ऊ बा संचालक व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आघाडीतर्फे करण्यात आले आहे. संबंधीत मेळावा लाडशाखीय वाणी मंगल कार्यालय,अमळनेर येथे दुपारी चार वाजेला होणार असून या मेळाव्यात आ चौधरी व डॉ चौधरी हे काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे आमदार चौधरी हे भाजपचे सहयोगी सदस्य असून ते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नेमका कुणाला पाठींबा जाहीर करतात हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.