आ. शिरीष चौधरींचा सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाअभावी पाणी कपातीचा आरोप

WhatsApp Image 2019 05 07 at 6.40.14 PM

अमळनेर(प्रतिनिधी ) जळोद व कलाली येथील तापीच्या डोहातील जलपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे कारण पुढे करीत येथील नगरपरिषदेने दि २ मे पासून शहराचा पाणीपुरवठा तीन ऐवजी सहा दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला असून सत्ताधाऱ्यांच्या नियोजन शुन्याचा हा परिणाम असल्याचा आरोप आ. शिरीष चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

 

सत्ताधाऱ्यांनी केवळ न. प. ची पाणीपुरवठा योजना आ शिरिषदादा मित्र परिवार आघाडीच्या हाती दिल्यास निश्चितपणे एवढ्याच जलसाठ्यावर तीन दिवसाआडच पाणीपुरवठा करून दाखवू असे जाहीर आव्हान आ.शिरीष चौधरी दिले आहे. तापी नदीवरील जळोद व कलाली येथील डोहात न. प. पाणी पुरवठा योजना कार्यरत असून ही जळोद ही मुख्य तर कलाली ही तातडीची योजना आहे.  मात्र संत सखाराम महाराज संस्थांनचा यात्रोत्सव नजिक असतानाच पालिकेने अचानक कमी जलसाठा शिल्लक असल्याचे कारण पुढे करून पाणी पुरवठा सहा दिवसाआड करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे अमळनेर जनता धास्तावली असतांना        आ. शिरीष चौधरी यांनी पत्रांवये सत्ताधारीवर तोफ डागली असून सत्ताधारी मंडळींची अपूर्ण इच्छाशक्ती, ढिसाळ नियोजनामुळेच जनता तहानलेली असल्याचा आरोप केला आहे.   ज्यावेळी आ. शिरिषदादा मित्र परिवार आघाडीची सत्ता पालिकेवर होती त्यावेळी देखील उन्हाळ्यात पाण्याची अशीच परिस्थिती होती. परंतु, तंत्रशुद्ध नियोजन असल्याने संपूर्ण उन्हाळाभर तीन दिवसाआड सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यशस्वी ठरलो होते.  विशेष म्हणजे  संपूर्ण अडीच वर्षे पाणी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ दिला नव्हता. अजूनही सत्ताधारी मंडळीनी योग्य नियोजन केल्यास पाणी कपात करण्याची कोणतीही आवश्यकता भासणार नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.  सत्तेत असताना जळोद येथील जलपातळी अतिशय खालावल्याने योग्य नियोजन करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवला, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी यांच्या संकल्पनेतून हिरा उद्योगच्या सीएसआर फंडातून एक दोन नव्हे तर तब्बल बारा बोअरवेल जळोद पंपावर केल्या. यामुळे गरजेनुसार पाणी उपलब्ध होऊन शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसाआडच सुरळीत राहिला. यासोबतच कलाली येथील डोहातून 8 कोटींची तातडीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी शासन दरबारी प्रचंड तगादा लावून मुख्यमंत्र्यांकडुन ती मंजूर करून घेतली व लागलीच निधी उपलब्ध करून अल्पवधीत योजना कार्यान्वित केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सत्ताधारी नेत्यांना आमच्या स्रोतची देखील एलर्जी असल्याने या स्रोतांकडे दुर्लक्ष केले. बोअरवेलचे कोणताही मेंटेनन्स यांनी ठेवला नाही तसेंच कलाली डोहातील योजनेला यांनी नजरेआड केले, भ्रष्टाचार आणि कमिशनच्या लालसेने आधीन झालेले सत्ताधारी पाणीपुरवठा ६ दिवसाआड करून गोर गरीब जनतेची अक्षरशः पिळवणूक करीत असल्याचा आरोप केला आहे.

Add Comment

Protected Content