चोपडा प्रतिनिधी । भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्याग व समर्पणाच्या भावनेतून पक्षाच्या प्रचारासाठी झटावे असे आवाहन ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी केले. जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर येथील पहिल्या भेटीत ते बोलत होते.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे यांनी आज चोपडा येथे सदिच्छा भेट दिली. भाजपा कार्यालयात सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष आ. भोळे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेला तसेच माजी खासदार व जिल्हाध्यक्ष स्व. हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर जिल्हाध्यक्षाचे स्वागत व सत्कार तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल यांनी केला. जिल्हाध्यक्षांचे हस्ते श्रीराम जन्मभूमिसाठी कारसेवा करणारे कारसेवक जेष्ठ कार्यकर्ते तिलकचंद शहा व मुन्ना शर्मा यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा चिटणीस राकेश पाटील व जोगिंदर जोहरी या कोरोना योध्दांचा ही सत्कार करण्यात आला..
याप्रसंगी माजी पं.स.सभापती आत्माराम म्हाळके तालुका भाजपाचा इतिहास कथन केला. तर तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांनी मनोगतात तालुका भाजपाची संघटनात्मक वाटचाल सांगितली.यावेळी बाजार समिती संचालक धनंजय पाटील, शेतकी संघाचे माजी व्हॉ.चेअरमन हिंमतराव पाटील, पंकज पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष तुषार पाठक, पदाधिकार्यांनी आपल्या विविध विषयावर जिल्हाध्यक्षांनी लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले.
चोपडा तालुका ग्राम पंचायत सरपंच संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष रावसाहेब पाटील,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,डॉ.विक्की सनेर आदिंनी कार्यकाळ संपलेल्या ग्रा.पं.वर राजकीय व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती न करता शासकिय अधिकार्यांची नियुक्ती करावी. किंवा सध्याच्याच लोकप्रतिनिधींना अधिकार द्यावेत अशा मागणीचे निवेदन सादर केले.
त्यानंतर पक्ष कार्यालयाच्या पटागंणात माजी .खासदार व जिल्हाध्यक्ष स्व.हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हरित क्रांती योजनेअंतर्गत वृक्षारोपण जिल्हाध्यक्ष आ.भोळे व सर्व मान्यवर पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आले..
या कार्यक्रमास तालुका उपाध्यक्ष देविदास पाटील,चंद्रशेखर पाटील,योगराज पाटील,तापी सुतगिरणी संचालिका रंजना नेवे,हिंमतसिंग पाटील,जिल्हा मंत्री गणेश माळी, जिल्हा संवाद संयोजक भरत सोनगिरे,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील,ता युवामोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस मनोहर बडगुजर,सुनिल सोनगिरे, चंद्रशेखर ठाकरे, जीवन पाटील, प्रसिध्दी प्रमुख यशवंत जडे, अनिल पालिवाल, व्यापारी संघटना अध्यक्ष हेमंत जौहरी,लक्ष्मण पाटील,विठ्ठल पाटील,विजय बाविस्कर,ज्ञानेश्वर बाविस्कर,भाईदास बाविस्कर,विवेक गुर्जर,विकास पाटील,डॉ.भारती क्षिरसागर,माधुरी अहिरराव,वंदना पाटील,रंजना मराठे,सुनिल पाटील,कैलास पाटील,सुरेश चौधरी,योगेश घोगरे,प्रविण चौधरी, भुषण महाजन,जितेंद्र महाजन,गोपाल पाटील,योगेश बडगुजर,मिलिंद वाणी,अजय भोई,विशाल भोई,अमित तडवी, कार्यालय मंत्री मोहित भावे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सरचिटणीस हनुमंतराव महाजन यांनी केले. तर आभार शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल यांनी मानले.