Home Cities बोदवड पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा : आ. राजूमामा भोळे यांचे आवाहन

पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा : आ. राजूमामा भोळे यांचे आवाहन

0
74

बोदवड प्रतिनिधी । भाजपचे पदाधिकारी आणि कार्यर्त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी केले. ते येथील सत्काराच्या कार्यक्रमात बोलत होते.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजूमामा भोळे यांची भाजपच्या जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पक्षातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कोरोना योद्धा व कार सेवकांचा सत्कार करण्यात आला. खासदार रक्षा खडसे यांची भाजप प्रदेश मंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. स्व.हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बाजार समिती आवारात वृक्षारोपण केले.

यावेळी आपल्या मनोगतातून आ. भोळे म्हणाले की, पक्षाने दिलेली जबाबदारी व पक्ष वाढीसाठी व संघटनेसाठी प्रामाणिक प्रयत्न करून ग्रामीण भागाचा विकास घडवून आणील. पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील आमदार भोळे यांनी केले.

या कार्यक्रमाला आ. राजूमामा भोळे यांच्यासह खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खेवलकर, सभापती किशोर गायकवाड, अनंत कुलकर्णी, मधुकर राणे, किरण वंजारी, विनोद कोळी, जीवन राणे, ब्रिजलाल जैन, विजय चौधरी, रामदास पाटील, कैलास चौधरी, सचिन राजपूत, डॉ. अजय वैष्णव, सईद बागवान, सलीम भाई, अनिल खंडेलवाल, अनिल पाटील, अनिल वराडे, विनोद घुले, कल्पेश शर्मा, राम आहूजा, आदी भगतसिंग पाटील उपस्थित होते.


Protected Content

Play sound