मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगरसह बोदवड आणि सावदा शहरातील विकासकामांसाठी चार कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
मुक्ताईनगर मतदार संघातील सावदा नगरपरिषद तसेच मुक्ताईनगर व बोदवड नगरपंचायतींना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत सन २०२३ २०२४ साठी लेखाशिर्ष (२२१७ १३०१) अंतर्गत चार कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
याच्या अंतर्गत सावदा नगरपरिषद रक्कम रू.०.२५ कोटी. बोदवड नगरपंचायत, जि. जळगाव रक्कम रु.१०० कोटी मुक्ताईनगर नगरपंचायत, जि. जळगाव रक्कम रु. २.७५ कोटी एकुण रक्कम रु. ४.०० कोटी रुपये असा निधी महाराष्ट्र शासन,नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक-नपावै २०२३/प्र.क्र.८७-४-१६१/नवि-१६ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- ३१ मे.२०२३ अन्वये मंजूर झाला आहे.
यामध्ये बोदवड शहर व तालुक्यातील राजपूत समाजाच्या मागणीनुसार प्राधान्य देत गट क्र.२३६/२ मध्ये खुल्या भूखंडावर योगा हॉल बांधकाम करणे यासह विविध विकास कामे देखील मंजूर झालेले आहेत. ही कामे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दि.३१ मे२०२३ च्या प्रसिद्धी पत्रकान्वये मंजूर झालेले असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे.
या निधीतून सावदा नगरपरिषद हद्दीतील श्री.स्वामी समर्थ केंद्राजवळ सांकृतिक सभागृह बांधकाम करण्यासाठी २५ लक्ष; बोदवड नगरपंचायत हद्दीतील गट क्र.२३६/२ मध्ये खुल्या भूखंडावर योगा हॉल बांधकाम करण्यासाठी ५० लक्ष मिळाले आहेत. यासोबत बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.७ मध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ५० लक्ष मिळणार आहेत. दरम्यान, यासोबत मुक्ताईनगर पंचायत हद्दीमध्ये विविध प्रभागांमध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या कामांसाठी २ कोटी ७५ लाखांचा भरीव निधी मिळाला आहे.