Home धर्म-समाज आदिवासी बांधवांच्या मागणीसाठी आंदोलनाला आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाला भेट

आदिवासी बांधवांच्या मागणीसाठी आंदोलनाला आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाला भेट

0
24

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आज अधिवेशन काळात आदिवासी बांधवांच्या वन हक्क व वन दावे व इतर प्रलंबित मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्च्यांच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे विधान भवनाबाहेर सुरू असलेल्या आंदोलन सुरू होते. या आंदोलनास मुक्ताईनगर मतदार संघातील ही आदिवासी बांधव सहभागी असल्याचे पाहून आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाला भेट दिली

व मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व राज्याचे वनमंत्री यांच्याशी चर्चा करून गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले वन हक्क व दावे या संदर्भात अधिवेशनातमुद्दा लावून धरणार असल्याची ग्वाही आंदोलनकर्त्याना दिली. लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा ताई शिंदे यांच्याशी चर्चा केली.

 


Protected Content

Play sound