मुंबई प्रतिनिधी । दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आता एका बाईला शौर्य दाखवत असल्याबद्दल टीका करत, एक नारी….शिवसेना पर भारी असे म्हणून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेची जोरदार खिल्ली उडविली आहे.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे आता उघडपणे कंगना राणावत हिच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. या अनुषंगाने त्यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ”शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना उघड आव्हान दिलंय या महिलेने. जिने बॉलीवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेने समोर झुकेल काय? दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायत.”
शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना उघड आव्हान दिलंय या महिलेने. जिने बॉलीवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेने समोर झुकेल काय? दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायत. https://t.co/cHVRB0FnlD
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 6, 2020
दरम्यान, याआधी माझी ताकद काय आहे, हे १०५ निवडून आल्यानंतर विरोधात बसलेत त्यांना विचारा असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावर ”विश्वासघाताने १०५ संख्या असलेल्या पक्षाला विरोधी पक्षात बसावे लागले हे खरे. सत्ता हाती आहे, परंतु धमक नसल्याने मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडत नाही त्याचे काय? घरात कडी लावून बसायला सत्ता हस्तगत केली होती काय ?” असा सवालही आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. यानंतर एका ट्विटमध्ये त्यांनी कंगनाचा फोटो शेअर करून ”एक नारी…शिवसेना पर भारी” असे म्हणून शिवसेनेला खिजविले आहे.
एक नारी
शिवसेना पर भारी… pic.twitter.com/oHBKTcZmve— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 6, 2020