Home Cities यावल प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मिथुन सावखेडकर

प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मिथुन सावखेडकर


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील सामजिक कार्यकर्ते मिथुन सावखेडकर यांची प्रहार अपंग क्रांती सेना या संस्थाच्या दिव्यांग विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याची मुलुख मैदान तोफ म्हणुन ओळखले जाणारे ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील अपंग, अनाथ, विधवा, परितकत्या, निराधार यांच्या पर्यंत संस्थेचे ध्येय धोरण व कार्याची माहिती व प्रसार प्रचार सर्व सामान्य पर्यंत पोहोचून त्यांना न्याय मिळून देण्याचे प्रयत्न करण्यासाठी अपंग क्रांती सेना ही संपूर्ण राज्यात कार्यरत करत असते.

या प्रहार अपंग क्रांती सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मिथुन अशोक सावखेडकर यांची संस्थेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे प्रहार अपंग क्रांती संस्थेचे जिल्हा सल्लागार शरद बारजिभे यांच्यासह प्रहार अपंग क्रांती या संस्थेचे संस्था अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू व अध्यक्ष उतर महाराष्ट्र अध्यक्ष तथा भुसावळ माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, अपंग क्रांती संस्थेचे यावल तालुका अध्यक्ष प्रविण सोनवणे, तालुका उपाध्यक्ष जनार्दन कोळी, उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, दिलीप चौधरी, उत्तम कानडे, ललीत पाटील, प्रदीप माळी आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे .

 


Protected Content

Play sound