मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेवून केलेले आरोप व टिकेला आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आ.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून म्हणाले की, मुक्ताईनगर व बोदवड मतदार संघातील मुंढोळदे ते सुलवाडी या पुलासाठी ५० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून यासाठी जमिनी अधिग्रहित प्रक्रिया सुरू आहे. या पुलाचे काम लवकर पुर्ण होईल, मोठी कामे करण्यासाठीa वेळ लागतोच, तुमच्या काळातील म्हणजे २०१६ मधील कामे आज पर्यंत सुध्दा पुर्ण झालेली नाही. मी मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे, परतू तुम्ही सहावेळा म्हणजे ३० वर्ष आमदार उपभोगली. तालुक्यात दोन नद्या असतांना मुक्ताईनगर तालुक्यातील आर्धी गावे सुध्दा सिंचनाखाली आणता आले नाही. हे दुदैव आहे अशी टिका केली आहे.
बोदवड, मुक्ताईनगर तालुका निर्मिती ही प्रशासकीय बाब आहे ती निरंतर चालणारी बाब आहे. कोणतेही सरकार आले तरी गरजेनुसार भौगोलिक क्षेत्रानुसार जिल्हा निर्मिती तालुका निर्मिती होत असते. त्याचे श्रेय घेऊ नये अशी देखील टिका त्यांनी केली.
लोकसभा निवडणूकीच्या वेळी सुनबाईसाठी भाजपात येण्याचे संकेत दिले. परंतू विधानसभेत पुन्हा राष्ट्रवादीत येणार अशी तळमळ खडसेंची सुरू आहे. सुनेबाईसाठी राष्ट्रवादीचा उमेदवाराचा बळी गेला. असे असतांना आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी पक्ष एकनाथ खडसेंबाबत काय भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. कृषी महाविद्यालयासाठी १०० एकर जमीन दिली, ती एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची दिली नाही, तर ती देवा पाटील समाजाची जमीन दिली आहे. समाजाने तुम्हाला भरभरून दिले. परंतु खडसे यांनी समाजास काय दिले ? असा सवाल उपस्थित करीत देवा पाटील समाजाचे असलेले श्री.बढे व के.डी.पाटील यांना अडचणीत आणण्याचेच काम एकनाथराव खडसे यांनी केले असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
गेल्या तीस वर्षापासून पाहिजे तसा निधी मिळविला असता. पाहिजे तसा मुक्ताईनगर मतदार संघांचा विकास झाला नाही. ३० वर्षात अनेक पदे मिळाली. मात्र शेतकऱ्यांसाठी रस्ते करू शकले नाही. मी मात्र स्वखर्चातून 90 टक्के शेतरस्ते करून दाखवले आहेत. ते केवळ मुक्ताईनगर मतदारसंघातच होत नाही आहेत तर संपूर्ण राज्यात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होत आहेत. बेरोजगारांसाठी एमआयडीसी प्रकल्प करू शकले नाहीत संत भूमी असलेल्या मुक्ताईनगरात पहिल्यांदा सट्टा पत्ता जुगार व दारु अड्डे आणण्याचे महापाप कोणी केले त्यावेळेस कोणाची सत्ता होती टपरीयुक्त शहर केव्हापासून आहे.तुम्हाला टपरीमुक्त शहर करता आले नाही.परंतु मी येथे आठ दिवसात टपरीमुक्त शहर करून दाखवेल. तसेच खरे भूखंड माफिया तर तुम्ही आहात. भूखंडाचे श्रीखंड खाणारे तुम्हीच आहात असे म्हणत मुक्ताईनगर येथील एदलाबाद तालुका एज्युकेशन सोसायटीची शैक्षणिक संस्था एकनाथराव खडसे यांनी हडप केली व नोकरीसाठी टेंडर काढले जाते पैसे घेतल्याशिवाय कोणालाच त्या ठिकाणी लावले जात नाही इतकेच नव्हे तर जिल्हा बँकेत ही करण्यात आलेल्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेण्यात आले होते इतकेच नव्हे तर एकनाथराव खडसे यांनी 2 हजार सहाशे च्या वर प्रकल्पग्रस्तांना बिना पैशाने लावल्याचे म्हटले आहे परंतु हे सुद्धा ते खोटं बोलत असल्याचा आरोपही आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.
कोथळी येथील पुनर्वसन टप्पा २ मध्ये एकनाथराव खडसे यांचे वडील २ नोव्हेंबर १९८९ मध्ये वारल्यानंतर ९ जणांना २० एप्रिल २०११ रोजी वारस लावण्यात आले. परंतु त्यानंतर लगेच २५ मे २०११ रोजी दुसरी नोंद करण्यात आली. त्यात इतर भावंडांपासून हक्क सोड करण्यात आले. विशेष म्हणजे २००६ मध्ये एकनाथराव खडसे यांच्या वारलेल्या बहिणीचे हक्क सोड २०११ मध्ये कसे करण्यात आले, याबाबतचे पुरावे असल्याचेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आमदार खडसे यांच्याकडे ५० एकर जमीन होती. त्यात ५ भाऊ व चार बहिनी आहे. प्रत्येकाच्या हिस्सावर सुमारे १० एकर जमीन असे असताना एकनाथराव खडसे यांच्याकडे इतकी संपत्ती आली कशी ? ते नेमकी कशाची शेती करतात आणि माझी कोणती संपत्ती वाढली त्याचा पुरावा द्या. अन्यथा तुमचे कृष्ण कृत्य बाहेर काढणार..! इतकेच नव्हे तर 137 कोटींचा दंड पुन्हा परत आणणार असल्याचाही दावा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
आदिशक्ती संत मुक्ताई मंदिराचे काम का रखडले ? तुमच्या कार्यकाळात ते काम पूर्णत्वास का येऊ शकले नाहीत ? आम्ही तरी आमच्या सत्ता काळात गिरीश महाजन यांच्या सहकार्याने तीर्थ क्षेत्र पर्यटन विकास अंतर्गत मुक्ताई देवस्थानाला ‘अ’ दर्जा प्राप्त करून दिला तर शिरसाळा मंदिरास तीर्थक्षेत्राचा व दर्जा प्राप्त करून दिला इतकेच नव्हे तर बांधकामासाठी एक कोटी दिले यानंतर पुन्हा चार फुटी देणार आहे तर मुक्ताई संस्थांना दहा कोटींचा निधीही उपलब्ध करून दिला.
खडसे हे मंत्री होण्यापुर्वी माझा भाचा ठेकेदार म्हणून काम पाहत आहे. परंतू त्याची विनाकारण चौकशी लावण्यात आली. तुमच्यात दम असेल तर पुन्हा चौकशी लावा. माझा भाचा तुमच्या भाच्या सारखा नाही, तुमचा भाचा गुन्हेगार असून त्याचे महिला पोलीस अधिकाऱ्यावर अत्याचार करून खून केल्याचा आरोप आहे. असे सांगून आ.चंद्रकांत पाटील यांनी लाव रे तो व्हिडीओ असे सांगत मोबाईलवर क्लिप दाखविली. खडसेंचा यांचा राजेश पाटील नावाचा भाचा फरार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुक्ताईनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासाठी राजकारण करून याला विरोध करण्याचे आणि जनतेचे दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे.परंतू ही जागा नियमानुसार व शासकीय परवानगी घेवून ५० फुट ऊंचीचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी सांगितले.