पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा फटका सहन करावा लागणार आहे. बापू पठारे हे भाजपला रामराम करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. गणपती मंडळाला भेटी देत असताना पहिल्याच दिवशी तुतारीवर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या बापू पठारे भाजपमध्ये आहेत. २०१९ ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी २०१४ साली भाजपच्या जगदीश मुळीक यांनी बापू पठारे यांचा पराभव केला होता. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून वडगाव शेरी मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा अन्यथा दुसऱ्या उमेदवारासाठी काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पोर्शे अपघात प्रकरणात मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. त्यामुळे महायुतीतील फार्मूल्यानुसार टिंगरेना संधी मिळणार की भाजप वडगाव शेरी आपल्याकडे खेचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.