जळगाव प्रतिनिधी । मेहरूण येथील इकरा थीम वरिष्ठ महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली इकरा आयटीआयचे चेअरमन मजीद जकेरिया होते. वक्ता म्हणून कवयित्री बहिणाबाई विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ.मुनाफ शेख डॉ.अ.करीम सालार होते. डॉ .मुनाफ शेख यांनी पॉवर पॉईंट प्रझेंटेशनद्वारे अल्पसंख्यांक समाजाकरिता सरकार राबवत असलेल्या योजना विषयी विस्तृत माहिती दिली. तर डॉ.अ.करीम सालार म्हटले कि, अल्पसंख्यांक समाजात शासनाद्वारे राबविणाऱ्या योजना बद्दल जागरुकता नाही. समाजात जनजागृतीची मोठया प्रमाणावर आवश्यकता आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मजीदशेठ जकेरिया यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगंत करीता अल्पसंख्यांक समाजाचे विकास महत्तवपूर्ण आहे. कार्यक्रमात डॉ.मो.ताहेर शेख,डॉ.ज़बीऊल्लाह शाह व मोठया प्रमाणात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वकार शेख यांनी तर आभार डॉ.राजेश भामरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रभारी प्राचार्य पिंजारी आय.एम.यांनी विषद केली.