Home क्राईम कारण किरकोळ : सफाई कामगाराच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड !

कारण किरकोळ : सफाई कामगाराच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सेंट जोसेफ शाळेत साफसफाई करण्याच्या कारणावरून तीन जणांनी एका साफसफाई करणाऱ्या एकाला शिवीगाळ व दमदाटी करून डोक्यात लोखंडी रॉड टाकून दुखापत केल्याची घटना सोमवारी ३० जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शरीफ खान सिकंदर खान रा. सलार नगर, जळगाव हे शहरातील सेंट जोसेफ शाळेत साफसफाई करण्याचे काम करतात. याच साफसफाई करण्याच्या कारणावरून सोमवारी ३० जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याच्या सोबत काम करणारे भावेश गोविंद साळी, पवन राजेंद्र देशमुख आणि कोकीळा गोविंद साळी तिघे रा. जळगाव यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. तर यातील भावेश साळी याने शरीफ खान यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून त्यांना जखमी केले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे भावेश गोविंद साळी, पवन राजेंद्र देशमुख आणि कोकीळा गोविंद साळी तिघे रा. जळगाव या तिघांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेल उषा सोनवणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound