Home Uncategorized अश्लिल कृत्य करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; संशयिताला अटक

अश्लिल कृत्य करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; संशयिताला अटक


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्ती प्रेम करण्याची मागणी केली, तसेच पिडीतेला गार्डनमध्ये घेवून जावून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मोहीम हुसेन पिंजारी असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान तिची गावात राहणारा मोहिम हुसेन पिंजारी याच्याशी इन्स्टाग्रामवर चॅटींगच्या माध्यमातून ओळख निर्माण झाली. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी मोहितने पिडीत मुलीला इन्स्टाग्रामवर चॅटींग करून तिला ‘तु माझ्यासोबत लवशिप केली नाही तर मी तुझे फोटो व्हारयल करेल आणि तुझी बदनामी करेल’ असे सांगून २७ ऑगस्ट रोजी तिला शहरातील एका गार्डन मध्ये बोलावले. त्यावेळी तिच्या सोबत अश्लिल कृत्य करत अंगलट करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत मुलीने अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज हे करीत आहे.


Protected Content

Play sound