Home JCL एमआयडीसीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमआयडीसीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसीतील एच-सेक्टर परिसरात राहणाऱ्या ७ वर्षीय मुलीला एकाने कंपनीच्या मागे ओढून तिच्या सोबत अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसीमधील सेक्टर एच-२८ येथील कंपनीत बिहार राज्यातील दाम्पत्य वास्तव्याला आहे. त्यांच्या सोबत ७ वर्षीय चिमुकली ही देखील राहते. रविवारी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता याच परिसरात राहणारा राहूल गोरेलाल नार्वे रा. बिहार ह.मु. एमआयडीसी जळगाव याने पिडीत मुलीला कंपनीच्या मागे ओढून तिच्यासोबत अश्लिल वर्तन करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहूल गोरेलाल नार्वे रा. बिहार ह.मु. एमआयडीसी जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound