अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पिंपळे रोडवरील एका बंद शाळेच्या आवारात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार केला. तर तिच्यासह तिच्या कुटुंबियांना मारून ठाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडला आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिडीत मुलीने लहान बहिणीला शाळेत सोडल्यानंतर ती पायी घरी जात आसतांना संशयित आरोपी दिनेश रमेश भील रा. शांताबाई नगर, अमळनेर याने पीडीत मुलीचा हात पकडून रिक्षात बसवून शहरातील एका बंद शाळेच्या आवारात नेवून तिच्यावर जबरी अत्याचार केला. त्यानंतर तिला माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकेश अशी धमकी दिली. दरम्यान हा प्रकार पिडीत मुलीने घरी जावून सांगितला. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी दिनेश रमेश भिल रा. शांताबाई नगर अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल हे करीत आहे.