Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; अपहरणाचा गुन्हा दाखल

जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; अपहरणाचा गुन्हा दाखल

0
175


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बुधवारी २५ मार्च रोजी रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. मंगळवारी २४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. ही माहिती मिळताचा पिडीत मुलीच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय शेलार हे करीत आहे.


Protected Content

Play sound