Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
203


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका भागातील १३ वर्षीय मुलगी राहते. शनिवारी, ३ मे रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या मुलीला काहीतरी प्रलोभन दाखवून फूस लावली आणि तिला अज्ञात स्थळी पळवून नेले. सकाळी घरात मुलगी दिसून न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात आणि संभाव्य ठिकाणी तिचा शोध घेतला, परंतु तिचा कोणताही पत्ता लागला नाही. नातेवाईकांनी रात्री नऊ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील हे करत आहेत.


Protected Content

Play sound