Home Cities अमळनेर प्रेमविवाहाचा राग, वृद्धेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

प्रेमविवाहाचा राग, वृद्धेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

0
169


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील शिरूड गावात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा तिच्या मुलाने प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरून एकाने विनयभंग केल्याची घटना शुक्रवार, २ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात शनिवारी, ३ मे रोजी दुपारी ३ वाजता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरूड गावातील एका भागात ६० वर्षीय वृध्द महिला ही आपल्या मुलासोबत वास्तव्याला आहे. वृद्ध महिलेचा तिच्या मुलाने प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरून रवींद्र हिरामण वैराळे रा. शिरूड ता.अमळनेर याने वृद्ध महिलेला शिवीगाळ, मारहाण केली व अश्लील चाळे करत विनयभंग केला. यावेळी त्याने महिलेच्या जेठाणीला देखील शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत.


Protected Content

Play sound