Home क्राईम शेत शिवारातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

शेत शिवारातून अल्पवयीन मुलीचे अपहरण


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील शेत शिवार परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना २५ मार्च रोजी पहाटे ५ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २९ मार्च रोजी रात्री ९ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील भुसावळ येथील शिवपूर कन्हाळा शिवारात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २५ मार्च रोजी पहाटे ५ वाजता पिडीत मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून पळवून नेले. हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नंदकिशोर काळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound