Home क्राईम बसस्थानकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; अपहरणाचा गुन्हा दाखल

बसस्थानकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; अपहरणाचा गुन्हा दाखल

0
183


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरामध्ये घरी जाण्यासाठी जाणण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पोस्ट लावून पळून नेल्याची घटना बुधवारी २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात गुरुवारी २४ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. दरम्यान ती जळगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ती बसस्थानकात घरी जाण्यासाठी आली होती. त्यावेळी तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेले. त्यानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. परंतु तिच्या संदर्भात कुठलीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे पालकांनी गुरुवारी २४ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सुनील सोनवणे करीत आहे.


Protected Content

Play sound