Home क्राईम बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
153

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. सोमवारी १९ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही जळगावातील नवीन बसस्थानक परिसरात असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पंरतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.


Protected Content

Play sound