Home Cities अमळनेर मंत्री अनिल पाटील यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय; विरोधकांचा उडाला धुराळा

मंत्री अनिल पाटील यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय; विरोधकांचा उडाला धुराळा


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने अजित पवार गटाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर शेवट्या टप्प्यात महाविकास आघाडीतील ही जागा काँग्रेसला सुटली. आणि ज्येष्ठ नेते डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी दिली.

अमळनेर विधानसभा मतदार संघातून मंत्री अनिल पाटील हे ३३ हजार ४३५ मतांच्या फरकाने विजयी झाले आहे. एकुण २४ फेऱ्यांमध्ये त्यांनी प्रत्येक फेरीमध्ये त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्यासह इतरांचा दणदणीत पराभव झाला आहे. तर माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी केली. यामुळे येथे तिरंगी लढत झाली. यात प्रचाराच्या दरम्यान अनिल पाटील आणि शिरीष चौधरी यांच्याच जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामध्ये मंत्री अनिल पाटील हे ३३ हजार ४३५ मतांच्या फरकाने विजयी झाले आहे. यात त्यांना १ लाख ९ हजार ४४५ मते मिळवून ते विजयी झाले आहे. तर माजी आमदार शिरीष चौधरी यांना ७६ हजार १० मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल नाटू शिंदे यांना १३ हजार ७९८ मते मिळाली आहे. दरम्यान, मंत्री अनिल पाटील यांचा विजय झाल्याने पक्ष कार्यालयासह ठिकठिकाण कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केल्याचे दिसून आले.


Protected Content

Play sound