मंत्री अनिल पाटील उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील मंत्री अनिल पाटील हे गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी महायुती कडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सकाळी १० वाजता शहरातील मंगळ ग्रह मंदिर येथून रॅलीला सुरवात होणार आहे. सदर प्रसंगी प्रदेश राष्ट्रवादी कडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित राहण्याची शक्यता असून याव्यतिरिक्त जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खा. स्मिताताई वाघ व जिल्ह्यातील महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सदर महारॅली पैलाड चौफुली, दगडी दरवाजा,तिरंगा चौक, बस स्टँड, महाराणा प्रताप चौक मार्गे तहसील कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप होणार आहे. मंत्री अनिल पाटील व महायुतीच्या वतीनेतर्फे या रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Protected Content