बंदुकीचा धाकावर फायनान्स कंपनीतून लाखोंचे सोने लुटले

 

gun

पुणे (वृत्तसंस्था) चंदननगरमधील ‘आयआयएफएल’ गोल्ड फायनान्सच्या कार्यालयातून बंदुकीच्या धाकावर लाखो रुपयांचे सोने लुटल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली आहे.

 

पुणे-नगर रोडवरील भाजी मार्केटजवळ असलेल्या आनंद इम्पायर इमारतीमध्ये ‘आयआयएफएल’ गोल्ड फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात आज सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती कार्यालयात शिरले. यानंतर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची लुटून नेले. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Protected Content