मस्करी केल्याच्या कारणावरून मायलेकाला मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा गावात लहान मुलांमध्ये मस्करी केल्याच्या कारणावरून मायलेकाला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार १२ जून रोजी रात्री ७ वाजता घडला आहे. याप्रकरणी शनिवारी १५ जून रोजी दुपारी ३ वाजता मारवड पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तीन जणांविरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील निंभोरा गावात वैशाली बाळू भिल या महिला मुलगा कृष्णा बाळू भील यांच्यासह वास्तव्याला आहे. बुधवार १२ जून रोजी सायंकाळी ७ वाजता वैशाली भिल या त्यांच्या घरासमोर मुलगा कृष्णा भिल याच्या सोबत बसलेल्या होत्या. त्यावेळी कृष्णाने मस्करी केल्याच्या रागातून गावात राहणारे विश्वास मगन कोळी, गायत्री विश्वास कोळी आणि मंजुळाबाई मगन कोळी तिघे रा. निंभोरा यांनी वैशाली भिल व त्यांचा मुलगा कृष्णा भील यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मायलेक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अमळनेर ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी शनिवारी १५ जून रोजी दुपारी ३ वाजता मारवड पोलीसा तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे विश्वास मगन कोळी, गायत्री विश्वास कोळी आणि मंजुळाबाई मगन कोळी तिघे रा. निंभोरा या तिघांवर मारवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील हे करीत आहे.

Protected Content