तुळजा भवानी नगरातून परप्रांतीय तरूण बेपत्ता

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील तुळजा भवानी नगरातून २४ वर्षीय परप्रांतीय तरूण हा रूमवर कपडे धुण्यासाठी जात असल्याचे सांगून १२ मे रोजी सकाळी १० वाजेपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी अखेर मंगळवारी २१ मे रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पप्पुकुमार बिरेंद्र महतो वय २४ रा. झारखंडा ह.मु. तुळजा भवानी नगर, चाळीसगाव असे बेपत्ता झालेल्या परप्रांतीय तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, झारखंड राज्यातील रहिवाशी असलेला तरूण पप्पुकुमार बिरेंद्र महतो हा तरूण कामाच्या निमित्ताने चाळीसगाव शहरातील तुळजाभवानी नगरात वास्तव्याला आहे. त्याचे मित्र देखील या परिसरात राहतात. १२ मे रोजी सकाळी ११ वाजता पप्पु हा त्याचा मित्र सचिन कुमार महतो यांच्याकडे आलेला होता. त्यावेळी त्याने मी कपडे धुण्यासाठी रूमवर जात असल्याचे सांगून तो कुठेतरी निघून गेला. त्यामुळे त्याच्या मित्राने त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्याच्याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी २१ मे रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता सचिन कुमार महतो याने चाळीसगाव शहर पोलीसात धाव घेवून माहिती दिली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकेश पाटील हे करीत आहे.

Protected Content