यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सातपुडा वनक्षेत्रातील पावल वन विभागा अंतर्गत येणाऱ्या वैजापूर वनविभागातुन गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाने पाच जिवंत वटवाघुळांची परप्रांतिय चारचाकी वाहनाने अवैधरित्या वाहतुक करताना जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येवुन एकास अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात वनविंभागाच्या सुत्रांकडून मिळाळेली माहीती अशी की, यावल वनविभागाच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या वैजापुर वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक २२४ या क्षेत्रात वनविभागाच्या गस्तीवर असतांना पथकाने १० एप्रील रोजी (एमपी ०९ बीसी ४९३८) या ओमनी सुझुकी या चारचाकी वाहनाने या वाहनावरील चालक भरासिंग ग्यानसिंग बारेला रा.गुलझीरी पोस्ट. पाडल्या बोरवाल जि. खरगोन मध्यप्रदेश याच्या वाहनाची तपासणी केली. गाडीच्या आत निळया रंगाच्या कॅरेट मध्ये पाच जिवंत वटवाघुळ आढळून आले. या संशयीत व्यक्तिला वन विभागाने वाहनासह अटक केली. वन गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
संशयीत व्यक्तिस चोपडा न्यायालयात न्यायालय वर्ग१समोर हजर केले असता त्यास एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान वटवाघुळ हे निशाचर संसर्गजन्य प्राणी असुन, पशुधन विकास अधिकारी कर्जाणा यांच्या सलल्याने वनविभागाच्या वतीने त्या पाच ही वटवाघुळ यांना पुनश्च नैसर्गीक अधिवासात मुक्त करण्यात आले. संपुर्ण कार्यवाही ही सहाय्यक वनसंरक्षक वनजिव्य वनीकरण प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापुर एस.एम.सोनवणे, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक कावेरी कमलाकर, वनपाल वैजापुर ईब्राहीम तडवी, वनपाल बोरअजंटी अश्विनी धात्रक, वनपाल कर्जाणा अर्चना गवते, पोलीस कॉस्टेबल विशाल जाधव, वनरक्षक अभिषेक सोनवणे, विजय शिरसाट, लोकेश बारेला, होकाऱ्या बारेला, संदीप भोई, चुनिलाल कोळी, बाजीराव बारेला, हेमलता बारेला, सुशिल कोळी, निखिल पाटील, संदीप पाटील या अधिकाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.