धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथे आज जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भाजपाचा कार्यकर्ता मेळावा होता. परंतू काही अज्ञात लोकांनी भाजप मेळाव्याची पूर्वतयारी उधळल्यामुळे चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, थोड्याच वेळात सुरु होणाऱ्या मेळाव्यात भाजपचे नेते काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या सदंर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आज जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भाजपाचा कार्यकर्ते पाळधी येथे आयोजित करण्यात आला आहे. काल रात्री १ वाजेच्या सुमारास मेळाव्याच्या ठिकाणी काही लोकांनी येऊन तोडफोड केली. स्वयंपाक चालू असताना भांडे व भाज्या फेकल्या. तसेच खुर्च्या ही तोडल्या. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्याबरोबर धरणगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. परंतू तोपर्यंत तेथे कोणीच नव्हते. परंतू आज सकाळपर्यंत कोणीही तक्रार न दिल्यामुळे कोणताही गुन्हा दाखल नव्हता. दरम्यान, भाजपने थेट शिवसेनच्या गडात मेळावा ठेवल्यामुळे युतीत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. तोडफोड करणारे कोण होते? हे अद्याप समजू शकलेले नाही.