शॉर्टसर्किटमुळे टेलर दुकानाला मध्यरात्री आग; मेहरूण येथील घटना

जळगाव प्रतिनिधी । मेहरूण येथील टेलर दुकानाला शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत शिलाई मशीन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह शिलाईचे नवीन कपडे जळून खाक झाल्याची घटना मध्यरात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. 

 

अधिक माहिती अशी की, संजय रामकृष्ण सोनवणे (वय-४६) रा. हनुमान नगर, मेहरूण यांचे काशीनाथ लॉजरोडवर त्यांचे लक्ष्मी नगर मेहरूण रोडवर लेटरचे दुकान आहे. १३ मे रोजीच्या मध्यरात्री दुकानात शॉर्टसर्कीटमुळे दुकानाला आग लागली. यात शिलाई मशीन, इंटरलॉक शिलाई मशीन, नवीन ड्रेस, पंखे, पासबुक, टि.व्हि आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या आगीत दीड लाखाचे नुकसान झाले आहे. महापलिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझविली आहे. याप्रकरणी संजय सोनवणे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Protected Content