जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील रामेश्वर कॉलनीतील शिवसेना संपर्क कार्यालयामागे सुरु असलेल्या सट्टापेढीवर सोमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकली. या ठिकाणाहून सट्टा खेळण्याच्या साहित्यासह ८६० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील दत्त कॉलनीत शिवसेना संपर्क कार्यालयाच्या मागे सट्टा सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. तात्काळ सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे यांना कारवाईसाठी रवाना केले.
एमआयडीसी पोलीसांनी आज सोमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामेश्वर कॉलनीतील शिवसेना कार्यालयाच्या मागे सुरू असलेल्या सट्टापेढीवर धाड टाकली. येथून सट्टा खेळविण्याच्या साहित्यासह ८६० रुपये जप्त केले. तसेच सट्टा खेळविण्यासह अनिल लक्ष्मण माळी (वय-४३, रा. मोठा माळीवाडा, पाळधी खुर्द ता. धरणगाव) याच्यासह सट्टा पेढीमालक जावेद शेख सलीम रा. अशोक किराणा या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.