त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलीसांचे पथसंचलन

जळगाव प्रतिनिधी । त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर आज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हद्दीतील विविध भागातून पोलीसांनी पथसंचलन केले.

 

सविस्तर असे की, त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे विविध भागात पोलीस पथसंचलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने गुरूवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस हद्दीतील इच्छा देवी चौक, अब्दुल हमीद चौक, तांबापूरा, बिलाल चौक, महादेव मंदीर चौक, मच्छी मार्केट, सिकलकर वाडा या भागातून पोलीसांनी शक्तीप्रदर्शन करत पथसंचलन केले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह दुय्यम पोलीस अधिकारी, ३५ पोलीस अंमलदार, एसआरपी सेक्शनचे २१ अमंलदार यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस व महिला पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Protected Content