चोपडा प्रतिनिधी । पंकज विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात संदेश रॅली काढण्यात आली असून “स्वच्छ भारत सुंदर भारत”,”प्लास्टिक हटाव, देश बचाव”,”कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरण संरक्षण करी” अशा घोषणा देऊन स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शालेय परिसरात जनजागृती करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कार्याक्रमाची सुरुवात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली. याप्रंसगी विद्यार्थ्यांनी महान पुरुषांचे विचार आपल्या शब्दातून व्यक्त केले. ज्ञानेंद्र पाटील या विद्यार्थ्यांने महात्मा गांधीजींची वेशभुषा साकारत विचार मांडले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसह सुधीक्षण पाटिल याने ‘दे दी हमे आझादी’ हे गीत सादर केले. तर नितिन कोल्हे यांनी ‘स्वच्छता व प्लास्टिक बंदी’ वर अहिराणी भाषेतील स्वरचित गीत गायन केले. महेश गुजर यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या बालपणी धाडसी कार्याची बोधकथा सांगितल्या. योगेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या अंगी असलेल्या स्वावलंबन, काटकसर, अहिंसा अन संयम आदी गुणांची ओळख करून विश्वशांती साठी व कल्याणासाठी गांधीजींच्या अहिंसेची नितांत गरज असलेचे सांगितले. गायत्री शिंदे व स्वाती पाटील यांनी माझी शाळा, स्वच्छ शाळा असा महत्वपूर्ण संदेश आकर्षक रांगोळीतून दिला. विद्यालयात चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पंकज बालसंस्कार केंद्र व प्राथमिक विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.